महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'ट्रॅक्टर मोर्चा' हरियाणा सरकारने दिली परवानगी; शाहजहानपूर ते मानेसर निघणार रॅली - ट्रॅक्टर रॅली हरियाणा सरकार परवानगी

हरियाणा-राजस्थान सीमेवर असणाऱ्या अलवरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा होत आहेत. प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी हे शेतकरी याठिकाणी येत आहेत. शेतकरी संघटनेंसोबत चर्चेंच्या फेऱ्यांनंतर अखेर हरियाणा सरकारने या मोर्चासाठी परवानगी दिली आहे...

tractor rally from shahjahanpur to manesar
'ट्रॅक्टर मोर्चा' हरियाणा सरकारने दिली परवानगी; शाहजहानपूर ते मानेसर निघणार रॅली

By

Published : Jan 25, 2021, 5:42 PM IST

चंदिगढ : हरियाणा-राजस्थान सीमेवर असणाऱ्या अलवरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा होत आहेत. प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी हे शेतकरी याठिकाणी येत आहेत. शेतकरी संघटनेंसोबत चर्चेंच्या फेऱ्यांनंतर अखेर हरियाणा सरकारने या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. शाहजहानपूर ते मानेसरपर्यंत जाण्याची परवानगी या शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

'ट्रॅक्टर मोर्चा' हरियाणा सरकारने दिली परवानगी; शाहजहानपूर ते मानेसर निघणार रॅली

विविध जिल्ह्यांतील तसेच राज्यांतील ट्रॅक्टर रवाना..

अलवर, कोटपुतली, जयपूर, शाहजहानपूर, दौसा यांसोबत आजूबाजूच्या कित्येक जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि ट्रॅक्टर शाहजहानपूर सीमेवर निघाले आहेत. यासोबतच राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि आजूबाजूच्या कित्येक राज्यांमधील शेतकरीही ट्रॅक्टर घेऊन रॅलीसाठी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दहा तासांची परवानगी..

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात पुढे आतापर्यंत या आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहणारा ट्रॅक्टर असेल. त्यामागे १६ राज्यांचे प्रतिनिधित्त्व करणारे ट्रॅक्टर असतील. या ट्रॅक्टरांच्या मागे हजारोंच्या संख्येत इतर ट्रॅक्टर असणार आहेत. सकाळी ९च्या सुमारास शहाजहानपूर सीमेवरून हे ट्रॅक्टर रवाना होतील. मानेसर येथे तिरंग्याला सलामी देत, हे ट्रॅक्टर पुन्हा शाहजहानपूर सीमेवर परततील. या रॅलीसाठी सरकारने १० तासांची परवानगी दिली आहे.

सुरक्षा व्यवस्था तैनात..

भिवाडीच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी आरसीच्या पाच तुकड्या तैनात असतील. तसेच, भिवाडीच्या सर्व पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी-अधिकाऱ्यांना याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्थेसाठी राजस्थानच्या ७५० पोलिसांनाही पाचारण करण्यात आले आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या १,५०० ट्रॅक्टरांना परवानगी..

हरियाणा सरकारतर्फे संयुक्त किसान मोर्चाच्या १,५०० ट्रॅक्टरांना या परेडसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार हरियाणाच्या सीमांवर सुमारे तीन ते चार हजार ट्रॅक्टर हजर राहण्याची शक्यता आहे. सरकारने एका ट्रॅक्टरवर तीन लोकांना बसण्याची परवानगी दिली आहे.

हेही वाचा :दिल्ली पोलिसांची 'किसान परेड'ला परवानगी; सुचवले तीन मार्ग..

ABOUT THE AUTHOR

...view details