महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निकिता तोमर हत्याकांड : तौसिफ आणि रेहान दोषी; शुक्रवारी जाहीर होणार शिक्षा - निकिता तोमर प्रकरण निकाल

२६ ऑक्टोबरला निकिता परीक्षेनंतर आपल्या घरी जात होती. यावेळी तौसिफ आणि त्याचा मित्र एका गाडीमधून तिथे आले. यावेळी त्यांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध दर्शवत झटापट केल्यानंतर तौसिफने तिला गोळी मारली, आणि तिथून पळून गेला. यातच तिचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता, ज्यावरुन आरोपींची ओळख पटली आणि पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी या दोघांना अटक केली होती...

Haryana Court convicts Tausif, Rehan in Nikita Tomar murder case
निकिता तोमर हत्या प्रकरण : तौसिफ आणि रेहान दोषी; शुक्रवारी जाहीर होणार शिक्षा

By

Published : Mar 24, 2021, 4:48 PM IST

चंदिगढ : निकिता तोमर हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. याप्रकरणी आरोपी असलेल्या तौसिफ आणि त्याचा मित्र रेहान यांना न्यायालयाने दोषी ठरवले. या दोघांना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी अझरुद्दीनची निर्देोष मुक्तता करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

२६ ऑक्टोबरला निकिता परीक्षेनंतर आपल्या घरी जात होती. यावेळी तौसिफ आणि त्याचा मित्र एका गाडीमधून तिथे आले. यावेळी त्यांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध दर्शवत झटापट केल्यानंतर तौसिफने तिला गोळी मारली, आणि तिथून पळून गेला. यातच तिचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता, ज्यावरुन आरोपींची ओळख पटली आणि पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी या दोघांना अटक केली होती.

निकिताच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ..

हे प्रकरण देशभरात गाजले होते. यानंतर हरियाणाच्या विधानसभेत लव्ह जिहाद कायदा लागू करण्यावरुन बराच गदारोळही झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी ७०० पानांची चार्जशीट दाखल केली होती. तसेच, ११ दिवसांमध्ये हे प्रकरण जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. निकिताचे पालक याप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा :कर्नाटक किसान महापंचायत : भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी राकेश टिकैत यांच्यावर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details