महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hardik Patel twitter account : गुजरातमध्ये काँग्रेसला बसणार मोठा धक्का...हार्दिक पटेल यांनी पक्ष सोडण्याचे दिले संकेत - Hardik Patel twitter account

हार्दिक पटेल यांनी त्याच्या ट्विटर प्रोफाइलवरून 'गुजरात काँग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष' ( Gujarat President of Congress  हे पद काढून गुजरात काँग्रेस सोडण्याचे आणखी एक संकेत दिले आहेत. हार्दिक पटेल काँग्रेस सोडणार की नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीही हार्दिक पटेलने ड्रग्जच्या मुद्द्यावरून गुजरात सरकारची अप्रत्यक्ष स्तुती केली होती.

हार्दिक पटेल
हार्दिक पटेल

By

Published : May 2, 2022, 6:49 PM IST

अहमदाबाद - गुजरातमधील काँग्रसचे नेते हार्दिक पटेल ( Hardik Patel vs Congress ) आणि गुजरात काँग्रेसमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता अशा स्थितीत मोठी बातमी आली आहे. ट्विटरमधील पोस्टरमधून हार्दिक पटेलचा ( Hardip photo twitter account ) फोटो काढून टाकला आहे, तर हार्दिक पटेल यांनी त्याच्या ट्विटर प्रोफाइलवरून 'गुजरात काँग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष' हे पद हटविले आहे.

हार्दिक पटेल यांनी त्याच्या ट्विटर प्रोफाइलवरून 'गुजरात काँग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष' ( Gujarat President of Congress हे पद काढून गुजरात काँग्रेस सोडण्याचे आणखी एक संकेत दिले आहेत. हार्दिक पटेल काँग्रेस सोडणार की नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीही हार्दिक पटेलने ड्रग्जच्या मुद्द्यावरून गुजरात सरकारची अप्रत्यक्ष स्तुती केली होती. त्यामध्ये करताना काँग्रेसचा लोगो, काँग्रेसमधील आपले स्थान किंवा गुजरात काँग्रेसच्या लेटर पॅडचा वापर केला नव्हता.

हार्दिक पटेल ट्विटर अकाउंट

काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपामध्ये जाणाऱ्या आमदारांना लोकांनी चपलांनी मार दिला पाहिजे, असे मत काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी दोन वर्षापूर्वी व्यक्त केले होते.

हेही वाचा-मेहुल चोक्सीकडून आयएफसीआयची २२ कोटी रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

हेही वाचा-Karnatak Cm Bommai : महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही- बसवराज बोम्माई

ABOUT THE AUTHOR

...view details