नवी दिल्ली -पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढत असल्याने केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिले आहे. वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे पुरी यांनी सांगितले.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत इंधनाच्या दरवाढीबाबत लेखी उत्तर दिले. वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय करात कोणतीही वाढ झालेली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. तसेच राज्य सरकारांकडून मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढविण्यात आल्यानेही इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारकडून कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेचले आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता अशा मुद्द्याबाबत विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.