महाराष्ट्र

maharashtra

'हर घर तिरंगा' मोहिमेने छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंता..!

By

Published : Aug 4, 2022, 10:23 AM IST

देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. या उत्सवात प्रत्येक घरात ( Har ghar tiranga campaign Bijapur ) तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येकजण या मोहिमेचा भाग बनत आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अनेकदा तिरंगा फडकवण्यास विरोध केल्याने बिजापूरमधील नक्षलग्रस्त भागात या मोहिमेबाबत लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

har ghar tiranga campaign bijapur
हर घर तिरंगा मोहीम बिजापूर

बिजापूर (छत्तीसगड) -देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. या उत्सवात प्रत्येक घरात ( Har ghar tiranga campaign Bijapur ) तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येकजण या मोहिमेचा भाग बनत आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अनेकदा तिरंगा फडकवण्यास विरोध केल्याने बिजापूरमधील नक्षलग्रस्त भागात या मोहिमेबाबत लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नक्षलग्रस्त भागातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवणे आव्हानात्मक होणार आहे.

माहिती देताना नागरिक

हेही वाचा -ईडीच्या 'या' कारवाईवर काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी, संसदेत गदारोळ होण्याची शक्यता

शहरी भागात तरुणांमध्ये मोहिमेविषयी उत्साह -बिजापूर जिल्ह्यातील शहरांतील लोकांशी चर्चा केली असता त्यांनी हर घर तिरंगा अभियानात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगितले. सर्वांना देशाबद्दल प्रेम आणि आदर आहे. त्यामुळेच प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भोपालपटनमचे रहिवासी बसंत राव म्हणाले. तर भोपालपटनमचा तरुण दत्तू शर्मा याने, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तरुणांमध्ये उत्साह आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरात तिरंगा फडकवला जाईल, असे सांगितले.


मोहिमेविषयी लोकांना कल्पना नाही - बिजापूरच्या ग्रामीण भागात हर घर तिरंगा मोहिमेबाबत लोकांना माहिती नाही. मोदकपाल गावचे रमेश कुमार, धनोरा गावातील सुशीला यांनी सांगितले की, आम्हाला हर घर तिरंगा मोहिमेची कोणतीही माहिती नाही. बिजापूरचे रहिवासी नागेश कुमार यांनीही सांगितले की, मला या मोहिमेबद्दल कोणतीही माहिती नाही. विशेष म्हणजे, दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला शाळा, पंचायत इमारती आणि सरकारी कार्यालयात तिरंगा फडकवला जातो, एवढेच लोकांना माहिती आहे. मोहिमेबद्दल काही कल्पना नसल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे. त्यामुळे, ग्रामीण भागात ही मोहीम चालेल का? याबाबत शंकाच आहे.


पोस्टात तिरंगा पोहचला नाही - 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत तिरंग्याच्या वाढत्या मागणीमुळे टपाल कार्यालयातूनही तिरंग्याची विक्री सुरू आहे. जिल्हा मुख्यालय बिजापूर, भोपालपटनम, मद्देड, आवापल्ली, बासागुडा यासह अनेक पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा विकण्याची तयारी करण्यात आली आहे, परंतु आजपर्यंत तेथे तिरंगा पोहचलेला नाही. पोस्ट ऑफिसमध्ये तिरंग्याची किंमत 25 रुपये ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफने शेकडो तिरंग्यांची ऑर्डर दिली आहे, मात्र आजपर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा पोहचलेला नाही, अशी माहिती भोपालपटनम पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर दिलीप झाडी यांनी दिली.

भोपालपटनम, मद्देर, आवापल्ली, भैरमगड ही जिल्ह्यातील उप कार्यालये आहेत. भोपालपटनममध्ये 17 शाखा, मद्देरमध्ये 16 शाखा, आवापल्लीमध्ये 38 शाखा, भैरमगडमध्ये 56 शाखा आहेत. आतापर्यंत कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा पोहचलेला नाही, अशी माहिती बिजापूरचे पोस्टमास्टर जोगेंद्र बहादूर सिंग यांनी दिली. तिरंगा नाही, तसेच आपल्याला मोहिमेबद्दल माहिती नसल्याचे ग्रामीण भागातील नागरिक सांगतात, त्यातच नक्षलवादी भाग. या पार्श्वभूमीवर आता बिजापूर जिल्ह्यात हर घर तिरंगा ही मोहीम यशस्वी होणार की नाही? पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा -Har Har Shambhu : 'हर हर शंभू'ची गायक फरमाणी नाझच्या समर्थनार्थ उतरली संतांची सर्वात मोठी संघटना.. म्हणाले, 'धर्मापेक्षा कर्म मोठे'

ABOUT THE AUTHOR

...view details