हनुमानगड ( राज्यस्थान) - जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाने आपल्याला नशा मुक्ती केंद्रात पाठवण्याच्या शंकेवरून रात्री चारपाईवर झोपलेल्या आपल्या आई-वडीलाची कुऱ्हाडीने हत्या ( minor killed their parrents in hanumangarh ) केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईवडिला शेजारी झोपलेल्या लहान भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला मेलेले समजून तो लोकांना ही गोष्ट सांगण्यासाठी बाहेर गेला.
पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया आरोपीला झाली अटक -
घटनास्थळाला पोलिसांनी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना परिजनांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. लहान भावाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला हरियाणातील सिरसा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कुऱ्हाडही जप्त केली आहे.
कुऱ्हाड हल्ल्यात आईवडीलांचा जागीच मृत्यू -
दोहेरी हत्यांकाडाची ही घटना हनुमानगड जिल्ह्यातील नोहर ठाणे परिसरातील फेफाना ( Hanumangarh Double Murder ) गावातील आहे. नोहर पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन हा व्यसनाधिन होता. नातेवाईकांनी व्यसन सोडण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले होते. तो बुधवारी व्यसनमुक्ती केंद्रातुन वापस आला होता. घरी आल्यानंतर त्याच्या मनात शंका निर्माण झाली की पालक त्याला पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवतील. याच शंकेतून बुधवारी अल्पवयीन मुलाने रात्री झोपल्यानंतर आई इंद्रा, वडील शीशपाल आणि लहान भाऊ अजय याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. कुऱ्हाड हल्लात आईवडीलांचा जागीच मृत्यू झाला होता. तर लहान भाऊ अजय हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सिरसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
'मी माझ्या आईवडीलांना आणि भावाला मारले'
हत्या केल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप किंवा भीती दिसत नव्हती. आईवडीलाची हत्या केल्यावर अल्पवयीन स्वतः बाहेर गेला आणि मी माझ्या आईवडीलांना आणि भावाला कुऱ्हाडीने मारले असे म्हणू लागला. हे ऐकून सगळे त्याच्या घराकडे पळू लागले. घरात सर्वत रक्तच रक्त होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसत होते. लोकांनी तात्काळ पोलिसांना घटनास्थळावर बोलवले. पोलीस घटनास्थळी पोहोचली त्यावेळी लहान भावामध्ये जीव होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे तर पोलिसांनी घटनास्थळावरून कुऱ्हाडही जप्त केली आहे.
हेही वाचा -Women Doped For Marriage In Thane : लग्नाचे आमिष दाखवत 26 महिलांची अडीच कोटीने फसवणुक करणारा लखोबा अटकेत