हैदराबाद : पहिला मंगळवार 09 मे 2023 रोजी आणि शेवटचा म्हणजेच चौथा मंगळवार 30 मे 2023 रोजी आहे. असे म्हटले जाते की. जो भक्त या काळात हनुमानाची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. याशिवाय हनुमानजींच्या काही मंत्रांचा जप केल्याने भक्तांचे दुःख आणि वेदना दूर होतात.
Bada Mangal 2023 : 'या' दिवसापासून सुरू होतोय बडा मंगल, जाणून घ्या पूजा विधी
हिंदू धर्मात मंगळवारला खूप महत्त्व दिले जाते. या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. त्याचबरोबर ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारचे महत्त्व अधिकच वाढते, कारण ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारला बडा मंगल किंवा बुढवा मंगल म्हणतात. यंदा ज्येष्ठा महिन्यात एकूण 4 मंगळवार पडत आहेत.
मंगळवारी हनुमानजी श्रीरामांना पहिल्यांदा भेटले :पुराणानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या मंगळवारी हनुमानजी श्रीरामांना पहिल्यांदा भेटले आणि याच महिन्यात त्यांनी भीमाचा अभिमान मोडला. हनुमानजींना चिरंजीवी असे संबोधले जाते.असे म्हटले जाते की, जगात जेथे बडा मंगलावर सुंदरकांड पठण किंवा रामचरितमानस पठण होते, तेथे बजरंगबली कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपस्थित राहतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. तुम्ही हनुमानजींच्या काही चमत्कारिक मंत्रांचा जपदेखील करू शकतात.
बडा मंगल पूजा विधी :बडा मंगळाच्या दिवशी सकाळी स्नान करून व्रत करावे. या दिवशी लाल वस्त्र परिधान करणे शुभ राहील. आता घराच्या ईशान्य कोपऱ्यात हनुमानजींचे फोटो ठेवा. हनुमान मंदिरातही पूजा करू शकता. सर्वप्रथम बजरंगीला सिंदूर अर्पण करा. यानंतर लाल वस्त्र, लाल फुले, लाल फळे, सुपारी, केवरा अत्तर, बुंदी अर्पण करा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय विश्वरूपाय अमित विक्रमाय, प्रकट पराक्रमाय महाबलाय सूर्य कोटिसंप्रभय रामदूताय या मंत्राचा जप करा. कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी हनुमान चालिसाचे सात वेळा पठण करावे. शेवटी त्यांची आरती झाल्यावर जास्तीत जास्त लोकांना प्रसाद वाटप करा आणि मुलांना गूळ, पाणी, धान्य दान करा.