शिमोगा ( कर्नाटक ) : कर्नाटकातील शिमोगा येथील दोन गावांमध्ये यावेळी आनंदाची लाट उसळली आहे. येथील शेट्टीहल्ली आणि चित्रशेट्टी गावात प्रथमच वीज येणार ( Sharavathi victims getting electricity ) आहे. यासाठी 3.33 कोटी रुपयांचा प्रस्ताव नुकताच मेस्कॉम ( Mangalore Electricity Supply Company Limited ) मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यानंतर 13 किमी भूमिगत केबलद्वारे दोन्ही गावे उजळून निघणार आहेत.
जंगलाला आग लागण्याचा धोका :लिंगनामक्की हे राज्यातील सर्वात मोठे जलाशय ( Lingnamakki Reservoir ) वीज निर्मितीच्या उद्देशाने बांधण्यात आले आहे. मात्र त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलली नाहीत. त्यामुळे शेट्टीहल्ली आणि चित्रशेट्टी गावातील लोकांना आजही मूलभूत सुविधांविना जगावे लागत आहे. त्याचवेळी शेट्टीहल्ली हे अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर वनविभागाने वीज देण्याच्या दृष्टीने पावले उचलली नाहीत. जंगलातून विद्युत तारा घेऊन जाव्या लागतील, त्यामुळे जंगलाला आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता.