हैदराबाद -हज यात्रेसाठी एक व्यक्ती सायकलवरून निघाली आहे. तो व्यक्ती अफगाणिस्तानचा आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. आता त्याला मदतीचा प्रस्ताव दिला जात आहे. मात्र, स्वत:च्या संसाधनांचाच वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक मुस्लिमाला आयुष्यात एकदा तरी हज करण्याची इच्छा असते. पण तिथे कसे पोहोचायचे ते त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांवर अवलंबून असते. अफगाणिस्तानातील एक व्यक्ती आपल्या सायकलवरून हज यात्रेसाठी निघाला आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीने ही माहिती देताच लोकांनी त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली. आता तोही प्रेरणास्थान बनला आहे.