वाराणसी ( उत्तरप्रदेश ) : ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणासंदर्भात दाखल याचिकांवर दुसऱ्या दिवशी जिल्हा न्यायाधीश डॉ.ए.के.विश्वेश यांनी सुनावणी ( varanasi district court Gyanvapi Mosque Case ) घेतली. सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या अर्जावर प्रथम सुनावणी होणार हे न्यायालयाने निश्चित केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, न्यायालयाने प्रथम मुस्लिम बाजूने दाखल केलेल्या 7/11 याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी 26 मेपासून कोर्टात सुनावणी सुरू होणार ( Varanasi court Gyanvapi case hearing ) आहे.
4 दिवस आयोगाची कारवाई : प्रत्यक्षात या संपूर्ण प्रकरणात 14 ते 16 मे या कालावधीत आयोगाची कार्यवाही झाल्यानंतर त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करणारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवीकुमार दिवाकर यांनी या प्रकरणावर कार्यवाही करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने २४ तासांची स्थगिती देत, हे संपूर्ण प्रकरण २० रोजी जिल्हा न्यायाधीश वाराणसी यांच्या न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळी स्पष्ट केले होते की, सर्वप्रथम या खटल्याच्या चालवण्याबाबत सुनावणी झाली पाहिजे. ज्याची मागणी स्थानिक न्यायालयाव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पक्षाने केली होती. त्याची सुनावणी सोमवारपासून वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात झाली.
जाणून घ्या काय आहे हा 7 नियम 11: मुस्लिम पक्षाचे वकील रईस अहमद अन्सारी म्हणाले की, 'आम्ही ही मागणी माननीय न्यायालयासमोर ठेवली होती आणि कोर्टाने ती मान्य करत आधी या प्रकरणाची सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. हे अत्यंत आवश्यक आहे, कारण न्यायालय आधी हे पाहणार आहे की जी प्रकरण त्यांच्या निदर्शनास आले आहे, त्या प्रकरणात इतर कोणताही जुना आदेश किंवा नियम आहे का? कोणत्याही जुन्या नियमामुळे कोणत्याही प्रकरणात काही अडचण आल्यास ती केस डिसमिस करता येते. त्यामुळेच मुस्लिम पक्षाच्या वतीने ही मागणी करण्यात आली. कारण 1991 च्या उपासना कायद्यांतर्गत, 15 ऑगस्ट 1947 पासून एखाद्या प्रार्थनास्थळाच्या वास्तविक स्थितीनुसार, त्याला राहण्याचा आदेश आहे आणि त्याच ठिकाणी पूजा करण्याचा अधिकार आहे. त्या आधारे 7/11 अन्वये सुनावणीची मागणी करण्यात आली होती. सध्या ती मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आला आहे. 26 मेपासून न्यायालयाच्या आदेशावर काय निर्णय घेतला जातो, त्याआधारे पुढील रणनीती ठरवली जाईल.