वाराणसी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणाची ( gyanvapi mosque case ) सुनावणी जिल्हा न्यायालयात ( Varanasi District Court ) पार पडली. वादी आणि प्रतिवादी दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीसाठी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी आजची तारीख निश्चित केली आहे.
Gyanvapi mosque case : जिल्हा न्यायालय आज ठरवणार सुनावणीची रूपरेषा - वाराणसी जिल्हा न्यायालय
ज्ञानवापी प्रकरणाची आज वाराणसी जिल्हा न्यायालयात ( Varanasi District Court ) सुनावणी होणार ( gyanvapi mosque case ) आहे. मागील आणि नवीन अशा एकूण 7 याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. त्यात जिल्हा न्यायालय आज सुनावणीची रूपरेषा ठरवणार आहे.
![Gyanvapi mosque case : जिल्हा न्यायालय आज ठरवणार सुनावणीची रूपरेषा Gyanvapi mosque](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15368235-thumbnail-3x2-gyanvapi.jpg)
ज्ञानवापी मस्जिद
हिंदू बाजूने सर्व प्रकरणे सोबत घेऊन पुढे जाण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, मुस्लिम पक्षाने पूजा कायदा प्रकरणी 7 नियम 11 अंतर्गत प्रथम सुनावणीची मागणी केली आहे. मागील आणि नवीन अशा एकूण 7 याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. आज कोणत्या याचिकांवर प्रथम सुनावणी होणार आणि संपूर्ण खटला कोणत्या स्वरूपात चालणार हे न्यायालय ठरवणार आहे.