वाराणसी :ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी प्रकरणाशी ( Gyanvapi Masjid Shringar Gauri Case ) संबंधित अर्जावर आज वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश ( Judge Dr. Ajay Krishna Vishvesh ) यांच्या न्यायालयात ( varanasi Court ) सुनावणी होणार आहे. या अर्जाद्वारे शृंगार गौरी प्रकरणासह ज्ञानवापी मशिदीशी संबंधित अन्य ६ प्रकरणांची सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एकत्रित सुनावणी करण्याची मागणी :शृंगार गौरी प्रकरणातील लक्ष्मी देवी, सीता साहू, रेखा पाठक आणि मंजू व्यास यांच्या वतीने न्यायालयात हे प्रार्थनापत्र देण्यात आले आहे. शृंगार गौरी प्रकरणाची आणखी एक याचिकाकर्ता राखी सिंह या अर्जाच्या समर्थनार्थ नाही. ज्ञानवापी मशिदीशी संबंधित 6 प्रकरणांची एकत्रित सुनावणी करण्याची मागणी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात करण्यात आली आहे. शृंगार गौरी प्रकरणातील याचिकाकर्त्या लक्ष्मी देवी, सीता साहू, रेखा पाठक आणि मंजू व्यास यांनी या मागणीशी संबंधित प्रार्थनापत्र न्यायालयात दिले आहे.