महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gyanvapi Dispute : ज्ञानवापी प्रकरणी अंजुमन इंतजामिया समितीविरोधात तक्रार - विश्व वैदिक सनातन संघाकडून तक्रार

ज्ञानवापीसंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी चौक पोलीस ठाण्यात अंजुमन इंतजामिया समितीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी पोलीस ठाण्यात स्पीड पोस्टद्वारे तक्रार पत्र पाठवून एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे.

Gyanvapi Dispute
फाईल फोटो

By

Published : May 27, 2022, 10:02 AM IST

वाराणसी - ज्ञानवापीसंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी चौक पोलीस ठाण्यात अंजुमन इंतजामिया समितीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी पोलीस ठाण्यात स्पीड पोस्टद्वारे तक्रार पत्र पाठवून एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. अंजुमन इंतजामिया समितीवर १९९१ च्या विशेष पूजा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पत्रानुसार, 1991 च्या पूजास्थान कायद्याच्या कलम 3/6 चे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन म्हणाले की, ज्ञानवापी प्रकरणात अंजुमन इंतजामिया समितीकडून जुन्या कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. सनातन संघटनेने आतापर्यंत न्यायालयात वेगवेगळ्या प्रकारे सहा याचिका दाखल केल्या असून, गुरुवारी सातवी तक्रारही पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पूजा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप - जितेंद्र सिंह म्हणतात की, आयोगाच्या कामकाजादरम्यान, जेव्हा सर्व लोक आवारात दाखल झाले होते, तेव्हा असे दिसून आले की ज्ञानवापी संकुलाचा रखबा क्रमांक 9130, रंगरंगोटीपासून ते बांधकाम करण्यापर्यंत अनेक भागांमध्ये काम केले गेले आहे, हे काम 1991 च्या विशेष पूजा स्थळ कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. पूजास्थान कायद्याच्या कलम ३/६ नुसार हे कृत्य गुन्ह्याच्या कक्षेत येत असल्याने चौक पोलीस ठाण्यात तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, याच 1991 साली कायद्याच्या माध्यमातून हिंदू बाजूने दाखल केलेली शृंगार गौरी नियमित दर्शन याचिका रद्द करण्यासाठी मुस्लीम पक्ष सातत्याने न्यायालयात बाजू मांडत आहे. मात्र, अद्याप आपल्याला असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे चौकी निरीक्षकांचे म्हणणे आहे. पत्र प्राप्त झाल्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

काय आहे ज्ञानवापी प्रकरण? - सध्या ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रातही हाच मुद्दा चर्चेत आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ज्ञानवापी मशिदीचे तीन दिवसांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान मशिदीमध्ये शिवलिंग सापडले आहे असा दावा हिंदू पक्षाने केला आहे, तर मुस्लिम पक्षाने हे दावे फेटाळले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयापासून (Allahabad High Court) ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत (Supreme Court) अनेक दावे करण्यात आले होते. त्यानुसार 16व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाने (Aurangjeb) काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) पाडून ज्ञानवापी मशीद बांधली होती. हा वाद अनेक वर्षांपासून असल्याने त्याला अनेक कांगोरे देखील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details