वाराणसी: अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे एएसआय सर्वेक्षण करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळ्यानंतर वाराणसीमध्ये त्याची तयारी पूर्ण झाली. पुरातत्व विभागाचे पथक पाहणीसाठी आज सकाळी ७:३० वाजता ज्ञानवापी कॅम्पसमध्ये पोहोचले आहे. पुरातत्व विभागाच्या सर्व्हे टीममध्ये एकूण 32 लोकांचा समावेश आहे. यामध्ये 7 लोक हिंदू बाजूचे आणि 9 लोक मुस्लिम बाजूचे असणार आहेत. प्रशासनाच्यावतीने गुरुवारी सर्वपक्षीयांची बैठक घेऊन सर्व माहिती देण्यात आली आहे.
संपूर्ण शहरात हाय अलर्ट घोषित -आज सकाळपासून सुरू झालेल्या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेत 43 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये मंजू व्यास, वकिल हरिशंकर आणि हिंदू पक्षाकडून विष्णू जैन, सुधीर त्रिपाठी यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणापूर्वी संपूर्ण शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ज्ञानवापी परिसरात सर्वेक्षणाची तयारी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुरातत्व सर्वेक्षण पथकाची बैठक घेतली आहे.
सीपीआर तंत्राचा वापर केला जाणार -ज्ञानवापी कॅम्पसमध्ये आग्रा, लखनौ, दिल्ली, प्रयागराज, वाराणसी आणि पाटणा आणि इतर अनेक शहरांमधील 32 लोकांची विशेष टीम सर्वेक्षण करणार आहे. 24 जुलैला पुरातत्व विभागाने संपूर्ण कॅम्पसच्या भिंतींवरील इतर गोष्टींचे मोजमाप करण्यासोबतच व्हिडिओ आणि फोटोग्राफीचे कामदेखील पूर्ण केले आहे. पुरातत्व विभागाकडून खोदकाम न करता जीपीआर तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. सर्वेक्षणात आवारात जमिनीत गाडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी सीपीआर तंत्राचा वापर केला जाणार आहे.
संपूर्ण जिल्ह्यात दक्षता घेण्याच्या सूचना -न्यायालयाच्या आदेशानुसार, धातूच्या, दगडाच्या मूर्ती आणि आत सापडलेल्या प्रत्येक गोष्टीची स्वतंत्र यादी देखील केली जाणार आहे. 21 जुलैच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयाने एसआयला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन यांनी जिल्हा अधिकारी आणि अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. संपूर्ण वाराणसीत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, ज्ञानवापी येथील सर्वेक्षणाबाबत मुस्लिम पक्षाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. या अपिलावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
हेही वाचा-
- Gyanvapi case: ज्ञानवापी प्रकरणात योगी आदित्यनाथ यांची 'एन्ट्री'.. आता होणार 'असं' काही
- Varanasi Gyanvapi Case: ज्ञानवापीचे पुरातत्व सर्वेक्षण सुरूच राहणार, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हिरवा सिग्नल