नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या काही तासांनी भाजपा नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांचे फेसबुक खाते हॅक झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या फेसबुक पेजवर हॅकर्सनी एक जुना व्हिडिओही पोस्ट केला. त्यामध्ये सिंधिया काँग्रेस पक्षाचे कौतुक करताना दिसत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. गुरवारी त्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.
फेसबूक पोस्ट व्हायरल होताच सिंधियाच्या आयटी टीमने ताबडतोब खाते रिकव्हर केले. अद्याप ज्योतीरादित्य सिंधिया यांचे खाते कोणी हॅक केले याची माहिती समोर आलेली नाही. आयटी तज्ञांची टीम शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्वाल्हेर क्राइम ब्रांच पोलीस स्थानकात केंद्रीय मंत्र्यांचा फेसबुक आयडी हॅक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे माहिती आहे. आयडी हॅक करून जुने व्हिडिओ आणि फोटो लावणऱया आरोपीचा शोध सुरू आहे.