महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

GV Sanjay Reddy : राहुल गांधींच्या आरोपांवर जीव्ही'चे उत्तर! म्हणाले, मुंबई विमानतळ अदानींकडे सोपवण्याचा कोणताही दबाव नव्हता

मुंबई विमानतळ विकण्यासाठी अदानी ग्रुप किंवा अन्य कोणाचाही दबाव नव्हता असा खुलासा जीव्हीके ग्रुपचे उपाध्यक्ष जीव्ही संजय रेड्डी यांनी केला आहे. काल मंगळवार काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर बोलतना सरकारने मुंबई विमानतळ 'हायजॅक' केले आणि GVK समूहावर दबाव आणून ते अदानी समूहाला दिले असा थेट आरोप केला होता. त्यावर रेड्डी यांनी वरील उत्तर दिले आहे. तसेच, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने जुलै 2021 मध्ये GVK कडून मुंबई विमानतळ विकत घेतले असही ते म्हणाले होते.

GV Sanjay Reddy
GV Sanjay Reddy on Rahul gandhi

By

Published : Feb 8, 2023, 3:43 PM IST

मुंबई :रेड्डी यांनी या कराराच्या सुमारे एक वर्ष आधी, आम्ही निधी उभारणीकडे लक्ष देत होतो कारण आम्ही आमच्या विमानतळ होल्डिंग कंपनीमध्ये सुमारे 10 वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. जेव्हा आम्ही बंगलोर विमानतळावर गेलो. त्याचे कर्ज थकीत होत होते. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदारांशी चर्चा करत होतो आणि आम्ही तीन गुंतवणूकदारांशी करार केला आहे. जरी ते अनेक अटी लादत होते. मग कोरोना आला आणि विमानतळाचा व्यवसाय तीन महिने ठप्प झाला. पैसे आले नाहीत. त्यामुळे पैशांचा अधिक दबाव निर्माण झाला असही ते म्हणाले आहेत.

आमच्यावर कर्जही होते : त्याच वेळी गौतम अदानी मला भेटले आणि म्हणाले. त्यांना मुंबई विमानतळाच्या व्यवसायात इंटरेस्ट आहे. त्यांनी फक्त एक महिन्यात पैसे देऊ असे सांगितले. आमच्यासाठी ते खूप महत्वाचे होते. ते म्हणाले की, सीबीआय किंवा ईडीने आमच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. कंपनीला त्याची गरज असल्याने आम्ही हा करार केला. कारण आम्हाला सावकारांना उत्तर द्यायचे होते. आमच्यावर कर्जही होते. त्यामुळेच आम्ही अदाणी समूहाबरोबर करार केला. राहुल गांधींच्या आरोपाबाबत बोलायचे झाल्यास, त्यावेळी आमच्यावर कोणताही दबाव नव्हता असा खुलासा रेड्डी यांनी केला आहे.

तपास संस्थांचा वापर करत जीवीके कंपनीवर दबाव आणला : मंगळवारी संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. पंतप्रधान मोदी यांनी नियम बदलवून कोणताही अनुभव नसणाऱ्या अदाणी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी दिली असे ते म्हणाले. तसेच, मोदी सरकारने नियम बदलल्यानंतर भारतातील सर्वात महत्त्वाचे असलेले मुंबई विमानतळ जीवीके कंपनीकडून घेऊन अडाणींना दिले. यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करत जीवीके कंपनीवर दबाव आणला, असा आरोपही त्यांनी केला होता.

राहुल गांधींनी काय म्हणाले होते? :काल मंगळवार (दि ८ फेब्रुवारी) संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. पंतप्रधान मोदी यांनी नियम बदलवून कोणताही अनुभव नसणाऱ्या अदानी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी दिली असा थेट आरोप केला आहे. तसेच, मोदी सरकारने नियम बदलल्यानंतर भारतातील सर्वात महत्त्वाचे असलेले मुंबई विमानतळ जीवीके कंपनीकडून घेऊन अदानींना दिले. यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करत जीवीके कंपनीवर दबाव आणला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा :अदानींची संपत्ती आठ वर्षात ८ अब्ज डॉलर्सवरून १४० अब्ज डॉलर्स कशी झाली? राहुल गांधींचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details