नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील दोमोहानीमध्ये रेल्वेचा अपघात झाला आहे. माध्यमाच्या अहवालानुसार गुवाहाटी-बीकानेर एक्सप्रेस 15633 (अप) ( Guwahati Bikaner Express derailed ) चार ते पाच डब्बे रुळावर ( 5 coaches derailed ) उतरले आहे. ही घटना आज सायंकाळी 5 वाजता घडली आहे. या अपघातात 5 जण दगावल्याची माहिती ( deaths in Jalpaigur rail accident ) मिळाली आहे.
रेल्वे मंत्री वैष्णव हे घटनास्थळी पोहोचणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने मदतीची घोषणा केली आहे. दोमोहानी रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वेने हेल्पलाईन क्रमांक (Railway Helpline numbers) - 03612731622, 03612731623 जाहीर केला आहे. या दोन हेल्पलाईनवर दुर्घटनेबाबत माहिती मिळू शकणार आहे.
हेही वाचा-Sanjay Raut Meets Rakesh Tikait : खासदार संजय राऊत यांनी घेतली राकेश टिकैत यांची भेट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेची घेतली माहिती.
जलपाईगुडी रेल्वे दुर्घटनेत ( Jalpaiguri Train derail ) काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शंका आहे. त्याबाबत अधिकृत पुष्टी मिळू शकली नाही. दुर्घटनेत किमान 30 प्रवाशी जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून दुर्घटनेची ( Mamata Banerjee discussion with Modi ) माहिती घेतली आहे.
हेही वाचा-Mekedatu Padayatra : काँग्रेसला पदयात्रा बंद करण्याचे कर्नाटक राज्य सरकारचे आदेश