महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gurugram Crime : नौदलाच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या करून केले मृतदेहाचे तुकडे, पोलिसांनी केली अटक - पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले

गुरुग्राममध्ये नौदलातील एका निवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत जलद तपास करून आरोपीला अटक केली आहे.

Gurugram Crime
गुरुग्राम क्राइम

By

Published : Apr 29, 2023, 3:30 PM IST

पोलिसांनी केली आरोपीला अटक

गुरुग्राम : पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली नौदलातील निवृत्त कर्मचारी जितेंद्र याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आठवडाभरातच या खुनाचे गूढ उकलले. पतीने आधी पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. यानंतर पतीने पत्नीची हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. गुरुग्राम पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात या हत्येचे गूढ उकलताना आरोपी पतीला अटक करून न्यायालयात हजर केले. आता आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण : 21 एप्रिल शुक्रवारी गुरुग्रामच्या मानेसर परिसरातून एक अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. गुरुग्रामचे डीसीपी क्राइम विजय गुप्ता यांनी सांगितले की, हा मृतदेह एका महिलेचा होता मात्र तिचे डोके, हात आणि पाय गायब होते. पोलिसांना घटनास्थळावरून विशाखापट्टणम येथील एका कारखान्यात बनवलेली पॉली बॅगही सापडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी गुरुग्रामच्या खेरकिडोला परिसरातून महिलेचे पाय जप्त केले. तेथेही पोलिसांनी पॉलीबॅग जप्त केली. या पॉलीबॅगने पोलिसांना मारेकऱ्यापर्यंत नेले.

आरोपी नौदलात स्वयंपाकी आहे : पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, विशाखापट्टणमचा हा कारखाना नौदलालाच या पॉलीबॅगचा पुरवठा करतो. त्यानंतर पोलिसांनी अशा प्रकरणांचा शोध सुरू केला ज्यामध्ये नौदलाचा कोणी कर्मचारी किंवा अधिकारी सहभागी आहे. दरम्यान, मानेसर पोलिस ठाण्यात एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिचा पती जितेंद्र नौदलातून निवृत्त झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र नौदलात स्वयंपाकी होता आणि त्याने 21 एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि संपूर्ण सत्य समोर आले.

पतीनेच केली पत्नीची हत्या : डीसीपी क्राइम विजय गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले की, 21 एप्रिल रोजी जितेंद्रची पत्नी सोनिया घराबाहेर पडली नाही. तर आरोपी जितेंद्र ट्रॉली बॅगसोबत दिसला, ज्यामध्ये सामान भरलेले दिसत होते. काही वेळाने जितेंद्र बाईकवरून परत आला तेव्हा ट्रॉली बॅग रिकामी होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जितेंद्रला अटक केली. चौकशीदरम्यान पतीने सांगितले की, त्याने आधी पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर घराच्या बाथरूममध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि गुरुग्रामच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले. जितेंद्रच्या ओळखीवर पोलिसांनी केएमपीजवळील तलावातून सोनियाचे शीर जप्त केले. मानेसर टेकडीवरून सोनियांचे कपडेही जप्त करण्यात आले आहेत.

का केली हत्या? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये जितेंद्रची बिहारमधील एका महिलेशी ट्रेनमध्ये भेट झाली होती. या दोघांची भेट अवैध संबंधापर्यंत पोहोचली, ज्यामुळे दोघांना एक मूल झाले. यावरून घरात भांडणे होत होती. त्यामुळे जितेंद्रने पत्नीची हत्या केली. जितेंद्र आणि सोनिया यांना एक छोटी मुलगी आहे. मुलगी शाळेत गेल्यानंतर जितेंद्रने पत्नीचा खून केला आणि मुलगी शाळेतून परत येण्यापूर्वी अवघ्या 3 तासांत मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी आरोपी जितेंद्रला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी पतीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा :Mafia Mukhtar Ansari Sentenced : मुख्तार अंसारीचा झाला फैसला, न्यायालयाने ठोठावली दहा वर्षाची शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details