महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gurugram Building Collapse : गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी - हरियाणात इमारत कोसळली

गुरुग्रामच्या सेक्टर 109 मधील चिंटेल पॅराडिसो हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील अपार्टमेंट इमारतीच्या छताचा काही भाग कोसळल्याने दोन जण ठार ( Gurugram Building Collapse ) झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली.

Gurugram Building Collapse
गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना

By

Published : Feb 11, 2022, 11:46 AM IST

Updated : Feb 11, 2022, 12:21 PM IST

गुरुग्राम (हरियाणा) - गुरुग्राममध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. गुरुग्रामच्या सेक्टर 109 मध्ये गुरुवारी सायंकाळी चिंटेल पॅराडिसो हाऊसिंग सोसायटीत अचानक मोठा आवाज आला. सोसायटीच्या वरच्या मजल्यावर इंटेरियरचे काम सुरू होते. त्यामुळे अचानक सातव्या ते पहिल्या मजल्यापर्यंतवरचे छत व मजला खाली कोसळला ( Gurugram building collapse ). त्यात ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या गाजियाबादमधून एनडीआरएफची आठवी बटालियन बचाव कार्य करण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना

घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल -

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सेक्टर 109 मधील चिंटेल्स पॅराडिसो येथे सहाव्या मजल्यावरील बांधकाम सुरू असलेले छत कोसळले आणि हा धक्का इतका गंभीर होता की पहिल्या मजल्यापर्यंतच्या सर्व छताचे नुकसान झाले आणि त्यामुळे जीवितहानी झाली. घटनेनंतर, गुरुग्राम पोलिस आयुक्त, अग्निशमन अधिकारी आणि नागरी संरक्षण, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

बचाव कार्यास सुरूवात -

इमारतीच्या ठिगाऱ्यात किती लोक अडकले आहेत याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे. परंतु आम्हाला शंका आहे की सुमारे 5-6 लोक त्यात अडकले असावेत, आम्ही घटनास्थळावरील ठिगारा घटवण्यास सुरुवात केली आहे, असे गुरुग्राम अग्निशमन विभागाचे उपसंचालक गुलशन कालरा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Saamana Editorial On Modi : मोदींनी ज्या संसदेच्या पायरीवर डोके ठेवले ती संसद अश्रू ढाळत असेल!

Last Updated : Feb 11, 2022, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details