नवी दिल्ली Gurugram Model Murder Case : गुरुग्राममधील मॉडेल हत्या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अभिजीत सिंह, हेमराज आणि ओमप्रकाश या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मॉडेल अभिजीत सिंहला ब्लॅकमेल करुन पैसे उकळत असल्याचा दावा अभिजीतनं पोलिसांकडं केला आहे. अभिजीतनं या मॉडेलची हत्या करुन तिचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी हॉटेलच्या दोन तरुणांकडं सोपवला होता. आपल्या बीएमडब्लू कारमधून या मॉडेलचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आल्याची कबुलीही त्यानं दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुलगी सिटी पॉइंट हॉटेलचे मालक अभिजीतसोबत गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता असल्याची तिच्या कुटुबीयांनी सांगितलं. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. हॉटेल सिटी पॉइंटचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता गुन्ह्याची उकल झाली. या प्रकरणी मुख्य आरोपी अभिजीत आणि 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींना न्यायालयात हजर करुन पुढील कार्यवाही केली जाईल. सुभाष बोकन, प्रवक्ता, गुरुग्राम पोलीस दल
मॉडेल हत्याकांडात तीन आरोपींना अटक :गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये सुप्रसिद्ध मॉडेलची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. या मॉडेलची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मुख्य आरोपी अभिजीत सिंह ( वय 56 वर्ष रा. मॉडेल टॉऊन हिस्सार ) हेमराज ( वय 28 वर्ष, रा नेपाळ ) आणि ओमप्रकाश ( वय 23 वर्ष, रा. जुरंथी जिल्हा जलपायगुडी पश्चिम बंगाल ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.