श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत गुपकर अलायन्स ही संघटना सर्व स्थानिक पक्ष एकत्र मिळून लढणार आहेत. जम्मू काश्मीरवर बळजबरीने कायदा लादणाऱ्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न अलायन्सकडून करण्यात येणार असल्याचे जम्मू काश्मीरचे काँग्रेसचे प्रमुख गुलाम अहमद मीर यांनी म्हटले.
शांततेत जागा वाटप
जागा वाटपाबाबत आज फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावर आम्ही समाधानकारक आहोत. राजकारणात काहीही १०० टक्के समाधानकारक नसते. मात्र, शांततापूर्ण वातावरणात सर्व चर्चा झाली. गुपकर अलायन्समधील सर्व पक्ष मिळून बरजबरीने कायदे लादणाऱ्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न करेल, असे मीर यांनी बैठकीनंतर सांगितले. योग्य उमेदवाराला निवडणूक देणं हा इतर पद्धतीने आंदोलन करण्यापेक्षा योग्य पर्याय आहे, असे मीर म्हणाले.