श्रीनगर (जम्मू काश्मीर) -नौगाम भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ( Gunfight between Militants and Security Forces Naugam ) झाली आहे. यात 3 अतिरेकी ठार झाल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे. सुरक्षा दलांनी शंकरपुरा भागाची सुरक्षा वाढवली होती, आणि दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती.
नौगाम भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 अतिरेकी ठार - अतिरेकी गोळीबार नौगाम
नौगाम भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ( Gunfight between Militants and Security Forces Naugam ) झाली आहे. यात 3 अतिरेकी ठार झाल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे.
संशयित ठिकाणी पथक पोहचताच लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे प्रत्युत्तर देण्यात आला आणि तो सुरू आहे, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली. कालही अतिरेक्याशी सुरक्षा दलाची चकमक झाली होती. ही चकमक पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरा येथील चारसो भागात झाली होती. यात लष्कर - ए - तोयबाशी संबंधित स्थानिक अतिरेक्याचा सुरक्षा दलाबोरबर झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता.
हेही वाचा -VIDEO: गोव्यात मंगळवारी आमदारांनी घेतली शपथ, इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार.. वाचा