महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gujrat Election 2022 : जामनगर उत्तर मधून रविंद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा यांचा धमाकेदार विजय - Jamnagar North Assembly seat result

जामनगर उत्तर मतदारसंघातून (Jamnagar North Assembly seat) भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) विजयी झाल्या आहेत. रिवाबा ह्या भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रवींद्र जडेजाच्या पत्नी आहेत. (Ravindra Jadeja wife). भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यापासून त्या सतत चर्चेत आहेत. (Rivaba Jadeja win)

रिवाबा जडेजा
रिवाबा जडेजा

By

Published : Dec 8, 2022, 7:08 PM IST

गांधीनगर : गुजरात निवडणुकीत जामनगर उत्तरची जागा सर्वाधिक चर्चेत होती. (Jamnagar North Assembly seat). येथून क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या पत्नी (Ravindra Jadeja wife) रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. (Rivaba Jadeja win). 27 वर्षांनंतर जामनगर उत्तरमधून भाजपने एका महिला उमेदवाराला संधी दिली होती. जामनगर उत्तर येथे रिवाबा यांची लढत त्यांच्याच मेहूण्या सोबत होती. ते कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. रवींद्र जडेजाचे वडील म्हणजेच रिवाबाच्या सासऱ्यांनी उघडपणे काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते.

रिवाबा जडेजा

येथे भाजप आणि काँग्रेस आळीपाळीने जिंकतात : जामनगर उत्तर येथे रिवाबा यांचा सामना काँग्रेसच्या बिपेंद्र सिंह जडेजा विरुद्ध होता. तर आम आदमी पक्षाने करसन करमूर यांना उमेदवारी दिली होती. या जागेबाबत बोलायचे झाले तर येथे भाजप आणि काँग्रेस आळीपाळीने जिंकतात. मात्र यावेळी ‘आप’ही या स्पर्धेत उतरली होती. क्रिकेटर रवींद्र जडेजाची बहीणच नाही तर वडिलांनीही या जागेवर काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details