अहमदाबाद (गुजरात) -पूर्वी रुद्राक्ष, मनी याने नटलेल्या राख्या आता फुल, कार्टून कॅरेक्टरने नटलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या दिसायला आकर्षक आणि मुलांच्या आवडत्या असतात. मात्र, आता राख्यांना गुजरात येथील एका व्यावसायिकाने नवे रूप दिले आहे. त्यानं चक्क राखींना हिऱ्यांनी नटले आहे. त्यामुळे, या राखींची किंमतही मोठी आहे. या राखी सध्या चर्चेचा विषयी ठरल्या आहेत.
हेही वाचा -Video : विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीव मुठीत धरून नदीतून प्रवास; हातात हात धरुन केली नदी पार
केवळ मौल्यवान दागिनेच नव्हे, तर व्यावसायिकाने पुनर्वापर केलेल्या सोन्याचा वापर करून 'डायमंड राखी' तयार केली. पर्यावरणपूरक कल्पनांचा वापर करून त्याने या राखी तयार केल्यात, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. या नाजूक राखीची किंमत सुमारे 3 हजार ते 8 हजार असल्याचे व्यावसायिकाने सांगितले.
आम्ही पर्यावरणपूरक राख्या बनवल्या आहेत, ज्या रिसायकल केलेल्या सोन्यापासून बनवल्या आहेत. राखीत हिऱ्याचा विशेष प्रकारे वापर केला आहे. ही राखी तीन ते चार हजाराला पडेल, असे उद्योजक रजनिकांत चाचंद यांनी सांगितले. रजनिकांत चाचंद सुरत शहरातून या राखींची विक्री करत असल्याचे एएनआयकडून सांगण्यात आले.
हेही वाचा -Nag Panchami 2022 : नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे सोमवारी मध्यरात्री उघडले; केवळ 24 तास मिळणार दर्शन