महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'तालिबानी' शिक्षा! फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोन मुलींना बेदम मारहाण

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन युवतींसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मुलींना काठ्यांनी जबर मारहाण करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

GUJARAT
गुजरात

By

Published : Jul 25, 2021, 9:56 AM IST

अहमदाबाद -गुजरातच्या दाहोदमधील धानपुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. फोनवर बोलल्याप्रकरणी दोन मुलींना बेदम मारहाण केली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दोन युवतींसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन युवतींसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मुलींना काठ्यांनी आणि लाथांनी जबर मारहाण करीत आहेत. तसेच मोबाईल कोठून मिळाला. कुणा-कुणाला नंबर दिला, असे प्रश्न तरुणींना आरोपी विचारत असल्याचे व्हिडिओत दिसते.

कळस म्हणजे लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले, मात्र कोणीच त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. फोनवर मुलांशी बोलल्यामुळे या मुलींना मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि मुलींचा जबाब नोंदवला. राज्यात आशा घटना घडत असून महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत.

अत्याचाराची शृंखला -

फक्त गुजरातच नाही तर मध्य प्रदेशमध्येदेखील आशा घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील तांडा पोलीस स्थानक क्षेत्रात फोनवर बोलल्याच्या कारणावरून तरुणीला जबर मारहाण केली होती. यात विशेष म्हणजे, मारणारी मुलं ही मुलींच्या नात्यातीलच होती. तसेच अलीराजपूरमध्ये वडील, भाऊ आणि नातेवाकांनी मिळून घरातल्याच मुलीला काठ्यांनी मारहाण केली होती आणि नंतर झाडावर टांगले होते. याच प्रकरची एक धक्कादायक घटना अलीराजपूरच्या सोंडवा भागात घडली होती. एका मुलाशी फोनवर बोलल्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनीच तीचे टक्कल केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details