अहमदाबाद - हिंदू धर्माचे अधिष्ठान विविध देवदेवतांत असले तरी ते प्रामुख्याने रामायणात दिसून येते, आणि म्हणूनच रामायण कथा या विविध काळात लिहील्या गेल्या. त्यांना जगतमान्यता पण आहे. हाच प्रयोग शिल्प असो की चित्रकला असो यातूनही अधोरेखित होतो. सुरत येथील 17 वर्षीय जान्हवी वेकारियाने 101 फुटाच्या कॅनव्हासवर संपूर्ण रामायण रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
जान्हवीने गुजरातच्या पारंपारिक कला शैलीमध्ये 101 फूट लांब कॅनव्हासवर रामायण रेखाटले आहे. नववीत शिकत असताना तिने हे चित्र बनवायला सुरुवात केली होती. तिला वेळ मिळाला, की ती चित्रे बनवायला बसायची. जेव्हा ती बारावीत पोहोचली, तेव्हा ही चित्रकला पूर्ण झाली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे खूप वेळ मिळाला. त्यानंतरच हे अद्भुत चित्र पूर्ण करू शकले, असे तीने सांगितले. तीच्या या कलेने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
जान्हवीने रामायणातील 15 प्रमुख घटनांची निवड केली. त्यात राम जन्मापासून रावणापर्यंतचा समावेश आहे. जन्मानंतर गुरुकुल, स्वयंवर, सीता हरण, लंका दहन हे अतिशय सुंदर चित्रण केले आहे. चित्र रेखाटताना तीने सर्व तपशीलांवर काम केले. म्हणजेच जंगल कसे असावे, राजवाडा कसा दिसला पाहिजे, वनवासात असताना कपडे कसे होते, इत्यादी.