महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऐकावं ते नवलंच! गुजरातच्या पोलीस ठाण्यात 2 भूतांविरोधात गुन्हा दाखल - गुजरात पंचमहाल न्यूज

गुजरातच्या पंचमहालमध्ये एका व्यक्तीने चक्क दोन भूतांविरोधात जांभूघोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वरसंग बारिया असे भूतांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

Gujarat
गुजरात

By

Published : Jun 30, 2021, 3:15 PM IST

अहमदनगर - गुजरातच्या पंचमहालमध्ये एक अजब घटना घडली आहे. एका व्यक्तीने चक्क दोन भूतांविरोधात जांभूघोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भूतांची टोळी त्याच्याजवळ आली आणि त्यातील दोन भुतांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असे संबंधित व्यक्तीने तक्रारीत म्हटलं आहे. अशी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले आहेत.

गुजरातमध्ये 2 भूतांविरोधात तक्रार दाखल

वरसंग बारिया असे भूतांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शेतात काम करत असताना आपल्याला भूताने मारण्याची धमकी दिल्याचे त्याने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली असता, संबंधित व्यक्ती हा मानसिकरित्या आजारी असल्याचे समोर आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

वरसंग बारिया मानसिकरित्या आजारी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details