नवी दिल्ली: स्वच्छ ऊर्जेला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी रविवारी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव भारतातील पहिले सौरऊर्जेवर चालणारे गाव ( solar powered village ) म्हणून घोषित केले. मोढेरा येथिल सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
1000 हून अधिक सोलर पॅनल :गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, गावातील घरांमध्ये 1000 हून अधिक सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत, जे गावकऱ्यांसाठी चोवीस तास वीज निर्माण करतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्यांना शून्य किंमतीत सौर वीज दिली जाईल. एका निवेदनानुसार, पीएम मोदी 24x7 सौर उर्जेवर चालणारे मोढेरा हे भारतातील पहिले गाव म्हणून घोषित करतील. अशा प्रकारचा पहिला प्रकल्प म्हणजे सूर्य मंदिर असलेल्या मोढेरा शहराच्या सौरीकरणाच्या मोदींच्या संकल्पनेला मूर्त रूप दिले आहे.
बॅटरी ऊर्जा संवर्धन प्रणाली :या प्रकल्पांतर्गत, जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला आहे आणि बॅटरी ऊर्जा संवर्धन प्रणाली (BESS) द्वारे एकमेकांशी जोडलेल्या निवासी आणि सरकारी इमारतींच्या छतावर 1,300 हून अधिक सौर पॅनेल स्थापित करण्यात आले आहेत. भारतातील अक्षय ऊर्जा क्षमता तळागाळातील लोकांचे सक्षमीकरण कसे करू शकते हे या प्रकल्पातून दिसून येईल, असे निवेदनात म्हटले आहे.