द्वारका Dwarka Toddler Dies :गुजरातमधील द्वारका येथील रान गावात सोमवारी (1 जानेवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास एक अडीच वर्षांची मुलगी खेळत असताना ती 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफच्या मदतीनं चिमुरडीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं.
- बोअरवेलमध्ये मुलीला ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. तसंच तिला दोरीनं बांधून 15 फूट खेचण्यात आलं. सुमारे 8 तासांच्या अथक परिश्रमानंतर तिला बोअरवेलमधून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. एंजल शाखरा असं या चिमुरडीचं नाव आहे. तिच्या मृत्यूमुळं कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण गावात शोककळा पसरलीय.
- रेस्क्यू ऑपरेशन :एंजलसोमवारी दुपारी आपल्या घराजवळ खेळत होती. खेळता-खेळता ती तिथं असलेल्या 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. ही बाब लक्षात येताच एंजलला वाचवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले. तसंच यासंदर्भातील माहिती एनडीआरएफ आणि इतर अग्निशमन विभागांना देण्यात आली. ही घटना गांभीर्यानं घेत बचाव पथकासह वैद्यकीय पथकही घटनास्थळी पोहोचले.