अहमदाबाद (गांधीनगर) -गुन्ह्याचा शोध घेताना प्रकरणाला नाट्यमय वळण लागल्याचा गुजरात पोलिसांनी अनुभव घेतला आहे.पथापूर कांडमध्ये एका बालकाला पित्याने सोडून पळ काढल्याची घटना घडली. या पित्याचा गुजरात पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी पित्याला राजस्थानमधून गांधीनगरला आणले. त्याची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
शुक्रवारी रात्री पेठापूरमध्ये अनाथ बालक आढळून आले होता. त्याच्या पालकांचा शोध घेताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालकाचा पिता सचिन दीक्षितने बालकाची आई मेहंदी पेथानीची हत्या केली. आरोपीने वडोदरामध्ये भाड्याने घेतलेल्या घरामध्ये ठेवलेला हिनाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
हेही वाचा-भाडेकरुने एवढा दिला त्रास, घरमालकाने घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी हा व्हिडिओतून सांगितली आपबीती
वादामधून केली पत्नीची हत्या
आरोपी सचिनने पोलिसांना सांगितले, की तो कुटुंबासमवेत उत्तर प्रदेशला जात होता. त्याबाबत हिनाला सांगितल्यानंतर तिने सोबत राहण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतप्त झालेल्या सचिनने हिनाचा गळा दाबून तिची हत्या केली. तिचा मृतदेह हा बॅगमध्ये पॅक करून स्वयंपाकघरात ठेवला. त्यानंतर तो बालकासमेवत घराबाहेर पडला. त्याने बालकाला गांधीनगरमधील पेठापूरच्या स्वामीनारायण गोशाळेतील पायऱ्यांवर ठेवले. त्या ठिकाणची आरोपीला माहिती होती. गोशाळेतून दूध आणि तूप आणण्यासाठी आरोपी नेहमी जात होता. त्यामुळे बालकाला तिथे सोडून आरोपी उत्तर प्रदेशला गेला.