अहमदाबाद (गांधीनगर) -पेठापूरमध्ये एका बालकाला पित्याने सोडून पळ काढल्याची घटना घडली होती. या पित्याचा गुजरात पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी पित्याला राजस्थानमधून गांधीनगरला आणले. त्याची चौकशी केली असता त्याने बाळाच्या आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपीचे नाव सचिन दीक्षित असे आहे. सचिनला 14 ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
सचिन दीक्षितने बाळाची आई हिनाची हत्या केली. आरोपीने वडोदरामध्ये भाड्याने घेतलेल्या घरामध्ये हिनाचा मृतदेह ठेवला होता. तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सचिन कुटुंबासमवेत उत्तर प्रदेशला जात होता. त्याबाबत हिनाला सांगितल्यानंतर तिने सोबत राहण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतप्त झालेल्या सचिनने हिनाचा गळा दाबून तिची हत्या केली. तिचा मृतदेह हा बॅगमध्ये पॅक करून स्वयंपाकघरात ठेवला. त्यानंतर तो बालकासमेवत घराबाहेर पडला. त्याने बालकाला गांधीनगरमधील पेठापूरच्या स्वामीनारायण गोशाळेतील पायऱ्यांवर ठेवले. त्या ठिकाणची आरोपीला माहिती होती. गोशाळेतून दूध आणि तूप आणण्यासाठी आरोपी नेहमी जात होता. त्यामुळे बालकाला तिथे सोडून आरोपी उत्तर प्रदेशला गेला.
दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप राहायचे-