महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Teesta Setalvad: मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाट यांना अटक; गुजरातला हलवले - तिस्ता सटेलवाड यांना गुजरात पोलिसांकडून अटक

तिस्ता सटेलवाड ( Teesta Setalvad ) ह्या मानवाधिकार कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार आहेत. आजच गुजरात एटीएसकडून ( From Gujarat ATS ) तिस्ता सेटलवाड यांना मुंबई येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाट
मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाट

By

Published : Jun 26, 2022, 9:44 AM IST

मुंबई -सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएस टीमने ताब्यात घेतले आहे. त्यांना अगोदर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर आता गुजरातला नेण्यात आल्याची माहिती आहे. ( Human Rights ctivist Teesta Setalwat ) सेटलवाड या सामाजिक कार्यकर्त्यासोबतच मानवाधिकार कार्यकर्त्या, पत्रकार आहेत.

अहमदाबाद शहर गुन्हे शाखेने सेटलवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर अहमदाबादला हलवले आहे. त्यानंतर आता भाजपकडून या घटनेवर जोरदार आरोप करण्यात येत आहेत. शुक्रवारी आपल्या आदेशात, सर्वोच्च न्यायालयाने 2002 च्या गोध्रा दंगलीनंतरच्या प्रकरणांचा तपास करणार्‍या एसआयटीच्या अहवालाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावत पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत असा निकाल दिला आहे.

2002 सालाच्या गुजरात दंगलीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला झाला होता. त्यानंतर एहसान जफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी एसआयटीने मोदी यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. झाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना सुप्रिम कोर्टाने मोदी याच्यासह इतरांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. तर, एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे. दरम्यान, एटीएसने सेटलवाड यांना ताब्यात घेतले आहे.


गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत झालेल्या हत्याकांडातील पीडित व्यक्तींसाठी तिस्ता यांच्या सिटिझन फॉर जस्टिस अँड पीस व सबरंग ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांना 7 कोटी 16 लाखांची देणगी मिळाली होती. त्यातील सुमारे दीड कोटी रुपये सेटलवाड आणि त्यांचे पती आनंद यांनी स्वत:साठी खर्च केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुलबर्ग सोसायटीतील एका पीडित व्यक्तीने पैशाच्या अफरातफरीप्रकरणी सेटलवाड व आनंद यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा -Eknath Shinde : 'मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय'

ABOUT THE AUTHOR

...view details