अहमदाबाद :गुजरात एटीएसने (Gujarat ATS) उत्तर प्रदेशातील बदायू येथून एका तरुणाला अटक केली आहे. (Gujarat ATS arrested). अमन सक्सेना (Aman Saxena) असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाने पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल पाठवला होता. (Threatened to kill Prime Minister). अटक करण्यात आलेल्या आरोपीने मुंबईतून आयटीआयचे शिक्षण घेतल्याचे समोर आले आहे. एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले असून, आता त्याची चौकशी सुरू केली आहे.
Gujarat ATS Arrested : पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक - पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी
पंतप्रधानांना धमकी देणाऱ्या तरुणाला गुजरात एटीएसने अटक केली आहे. (Gujarat ATS arrested). काही दिवसांपूर्वी या तरुणाने पंतप्रधानांना मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. (Threatened to kill Prime Minister).

Etv Bharat
आणखी दोन संशयित :आरोपी अमन सक्सेना याने पंतप्रधान कार्यालयाला मेल पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्यातील आरोपींसोबत गुजरातमधील एक तरुणी आणि दिल्लीतील एका तरुणाचाही समावेश असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी तरुणाची चौकशी सुरू आहे. पंतप्रधानांना आलेल्या धमकीच्या मेलमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.