गुजरात ( अहमदाबाद ) : ( Gujarat Elections ) 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी 5 वाजता संपला. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा, नड्डा, आदित्यनाथ आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपच्या प्रचारसभांना संबोधित केले. गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती ( Gujarat Chief Electoral Officer P Bharti ) यांनी सांगितले की, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता संपला. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाईल. केंद्रीय निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. ( gujarat assembly polls 2022 today last day )
गुरुवारी होणार मतदान :पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत, जिथे गुरुवारी मतदान होणार आहे. गुजरातमध्ये परंपरागतपणे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे, परंतु यावेळी विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 181 जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) रूपाने तिसरा पक्ष आहे. तर पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभलिया येथून निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळा आमदार कुंवरजी बावलिया, मोरबीचे 'हिरो' कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा आणि आपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया हेही रिंगणात आहेत.