महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gujarat assembly elections: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात किती आहेत कोट्याधीश? वाचा पक्षनिहाय उमेदवारांची संपत्ती - भाजप उमेदवार कोट्याधीश संपत्ती

भाजप, काँग्रेस आणि आपचे सर्व नेते धनदांडगे ( millionaire candidates in the fray ) आहेत. काँग्रेसचे इंद्रनील राजयुगुरु 159.84 कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत अव्वल तर भाजपचे पबुभा मानेक 115.58 कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर भाजपच्या सात उमेदवारांकडे 30 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे समोर आले आहे.

गुजरात निवडणूक
गुजरात निवडणूक

By

Published : Nov 19, 2022, 7:05 PM IST

अहमदाबाद:गुजरात विधानसभा निवडणुकीचा 1 डिसेंबर रोजी पहिला टप्पा आहे. 89 जागांसाठी 70 महिलांसह एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 39 पक्षांचे आणि 339 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी सादर ( Millionaires Candidates congress in assembly ) केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून त्यांच्यापैकी अनेकांकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे.

भाजप, काँग्रेस आणि आपचे सर्व नेते धनदांडगे ( millionaire candidates in the fray ) आहेत. काँग्रेसचे इंद्रनील राजयुगुरु 159.84 कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत अव्वल तर भाजपचे पबुभा मानेक 115.58 कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर भाजपच्या सात उमेदवारांकडे 30 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे समोर आले आहे.

सर्वाधिक कोट्याधीश भाजपचे उमेदवार :आपच्या दोन उमेदवारांनी प्रत्येकी 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे. मात्र, या यादीत सर्वाधिक कोट्याधीश भाजपचे उमेदवार आहेत. लक्षाधीशांच्या यादीतील भाजप उमेदवारांपैकी ( Congress millionaire candidates ) पबुभा मानेक हे 115.58 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह पहिल्या क्रमांकावर ( AAP millionaire candidates ) आहेत. त्यानंतर अमरेलीमधील राजुला येथील हिरा सोलंकी यांची संपत्ती 53.50 कोटी रुपये आहे. ५३.३९ कोटी रुपयांची संपत्ती असलेले परशोतम सोलंकी हे भाजपच्या उमेदवारांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते प्रकाश कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे 13.21 कोटी रुपयांची संपत्ती :काँग्रेसकडून ( Millionaires Candidates congress in assembly ) इंद्रनील राजयुगुरु या यादीत अव्वल, रापार्थी भचूभाई अर्थ्या 98.48 कोटी रुपयांच्या संपत्तीसह आणि मुलोभा कंडोरिया 85.41 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. आम आदमी पक्षाचे नेते प्रकाश कॉन्ट्रॅक्टर यांनी 13.21 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती घोषित केली आहे. त्यानंतर त्यांचे पक्ष सहकारी जिनाभाई खेनी यांनी रु. 8.90 कोटी संपत्ती घोषित केली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आणि उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी 70 महिलांसह एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. यामध्ये 39 पक्षांच्या उमेदवारांचा आणि 339 अपक्षांचा समावेश आहे, अशी माहिती गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये 182 सदस्यांची विधानसभा : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने सर्व 89 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर आम आदमी पार्टी (आप) 88 जागांवर, बहुजन समाज पक्ष (बसपा) 57 जागांवर लढणार आहे. सहा विधानसभा जागांवर इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) निवडणूक लढवित आहे. एकूण 1,362 उमेदवारांनी 89 जागांसाठी आपले अर्ज दाखल केले होते, जे 15 नोव्हेंबर रोजी छाननीनंतर 999 पर्यंत खाली आले होते आणि 17 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या 93 जागांसाठी निवडणूक आयोगाला आतापर्यंत 1,515 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आहे. गुजरातमध्ये 182 सदस्यांची विधानसभा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details