अहमदाबाद (गुजरात):गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चे (Gujarat elections 2022) पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी पार पडत आहे. या मतदानामुळे 69 महिला उमेदवार आणि 719 पुरुष उमेदवार मिळुन एकुण 788 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. गुजरात विभानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणाऱ्या 'सौराष्ट्र' (Saurashtra voters) प्रदेशाचा समावेश पहिल्या टप्प्यात होत असल्याने, पहिल्या टप्प्यातील मतदारांचा कौल निर्णायक मानला जात आहे.
एकूण 19 जिल्ह्यांमध्ये मतदान : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी मतदान होणार आहे. अमरेली, भरूच, भावनगर, बोताड, डांग, देवभूमी द्वारका, गिर सोमनाथ, जामनगर, जुनागढ, कच्छ, मोरबी, नर्मदा, नवसारी, पोरबंदर, राजकोट, सुरत, सुरेंद्रनगर, तापी आणि वलसाड हे 19 जिल्हे पहिल्या टप्प्यातील मतदान करतील.
19 जिल्ह्यांतील विशेष जागा : जसदनमधील कुंवरजी बावलिया, मोरबीतील कांती अमृतिया, पोरबंदरमधील बाबू बोखिरिया, तलाला येथील भगवान बरड, भावनगर परसोतम सोलंकी, जामनगर उत्तर रिवाबा जडेजा, वराछा येथील किशोर हे 19 जिल्ह्यांतील 89 जागांपैकी महत्वाचे उमेदवार आहेत. कतारगाममधून गोपाल इटालिया, जामखंभालियातून इशुदान गढवी आणि वराछामधून अल्पेश कथिरिया हे आम आदमी पक्षाचे खास उमेदवार असणार आहेत. तर अमरेलीमधून परेश धनानी आणि लाठीमधून वीरजी थुमर काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.