वडोदरा - गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अर्धांगवायूने त्रासलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णांच्या चेहऱ्याला मुंग्या लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णाच्या चेहऱ्यावर मुंग्या फिरत होत्या. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. सैयाजीराव जनरल रुग्णालयातील ही घटना आहे.
रुग्णालयाचा बेजबाबदारपणा, अर्धांगवायूने त्रासलेल्या रुग्णाच्या चेहऱ्याला लागल्या मुंग्या - Ants crawling on face of paralysed COVID-19 patient
गुजरातच्या एका रुग्णालयात अर्धांगवायूने त्रासलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णांच्या चेहऱ्याला मुंग्या लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
गुजरात
व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक 50 वर्षीय महिला आयसीयू बेडवर पडेलली दिसत आहे. तर महिलेच्या चेहऱ्यावर मुंग्या फिरताना दिसतात. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती आहे. रुग्णाला पाईपच्या माध्यमातून अन्न देण्यात येत होते. त्यामुळे मुंग्या लागल्या असाव्यात, असे रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. बेजबाबदारपणे वागणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रंजन अय्यर यांनी सांगितले.