अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. बावला बगोदरा मार्गावर हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावला बगोदराजवळ मिनी ट्रकने एका मोठ्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर किमान तीन जण जखमी झाले आहेत.
रस्त्यावर उभ्या ट्रकला मिनी ट्रकने धडक दिली : या अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडीही झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अहमदाबाद रेंजचे आयजी प्रेमवीर सिंह यादव यांनी ईटीव्ही भारतशी फोनवरील संभाषणात ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकच्या मागून येणाऱ्या एका भरधाव मिनी ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. एक पंक्चर ट्रक रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी एक मिनीट्रक मागून भरधाव वेगाने आला आणि त्याने ट्रकला धडक दिली. मिनी ट्रकमध्ये ३ लोक समोर बसले होते तर १० लोक आत बसले होते.
१० जणांचा मृत्यू : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पाच महिला आणि दोन पुरुषांसह तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. मिनी ट्रकमधील सर्व प्रवासी चोटिला धार्मिक स्थळाचे दर्शन घेऊन परतत होते. पोलिसांनी सांगितले की, जखमी लोकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक सुंदा गावातील रहिवासी आहेत.
अहमदाबादमध्ये आणखी एक हिट अँड रन : अहमदाबादमध्ये गुरुवारी आणखी एक हिट अँड रनची घटना घडली. गुरुवारी रात्री एलिझब्रिज येथे ही घटना घडली. येथे एका अज्ञात वाहन चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला धडक दिली. या घटनेत जमालपूरच्या टोकरसानी पोळ येथील साहिल अजमेरी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा :
- Bus Accident News: ओव्हरटेक करणे पडले महागात! बस पुलावरून खाली कोसळल्याने ३५ प्रवासी जखमी
- Satara Accident: बाळूमामांच्या दर्शनाला जाताना कार झाडावर आदळून चार जण ठार; चौघे गंभीर जखमी
- Road Accident: मुंबई-नागपूर हायवेवर भीषण अपघात; दुचाकीची अज्ञात वाहनाला मागून धडक, ३ भावांचा जागीच मृत्यू