अहमदाबाद- रस्त्यालगत असलेल्या झोपडीत ट्रक घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात गुजरातमध्ये अमरेली जिल्ह्यात घडला आहे. अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत.
चालकाने ट्रकमध्ये बदल करून तिचा क्रेनसारखा वापर केला होता. चालकाचे या क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या झोपडीत घुसले. या झोपडीत 10 जण झोपले होते, ही माहिती अमरेलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक निरलीप्त राय यांनी दिली. मृतामध्ये 8 आणि 13 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हा ट्रक राजकोटवरून जाफराबादच्या दिशेने जात होता. जखमीमध्ये 3 आणि 7 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.