महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Paperman of India : ओडिशातील साशा दासचा वर्तमानपत्र गोळा करून विश्वविक्रम - Paperman of India

भुवनेश्वरच्या साशा शेखर दासची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ( Guinness World Record of Shashank Shekhar Das )नोंद झाली आहे. त्यांना जूनी वर्तमाणपत्रे गोळा करण्याचा छंद आहे. याच छंदातून त्यांनी वर्तमाणपत्र गोळा करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ( World record by collecting newspaper ) नाव नोंदवले आहे. भारताचा पेपरमॅन म्हणून त्यांना ओळखले जाते.

Paperman of India

By

Published : Jun 8, 2022, 5:23 PM IST

भुवनेश्वर :भुवनेश्वरच्या शशांक शेखर दासची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांना जूनी वर्तमाणपत्रे गोळा करण्याचा छंद आहे. याच छंदातून त्यांनी वर्तमाणपत्र गोळा करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. भारताचा पेपरमॅन म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची ओडिसातच नाही तर, जगाच्या इतर भागातही वर्तमानपत्रांचे संग्राहलय बनवण्याची त्यांची इच्छा आहे.

'पेपरमॅन इंडिया' या नावाने प्रसिद्ध:साशा शेखर दास यांनी जागतिक संग्रहालय दिनानिमित्त वर्तमानपत्रे गोळा करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. त्यांनी लीकडेच इटलीच्या सेरिगो बोडानीचा विक्रम मोडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्यांनी 2 हजार साली उडिया वृत्तपत्रे गोळा करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्यांनी भारतातील इतर भाषांमधील वृत्तपत्रे गोळा केली. त्यांच्याकडे आतापर्यंत ५ हजार १०० हून अधिक प्रकारची वर्तमानपत्रे जमा आहेत.

94 प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रे : त्यापैकी त्यांच्याकडे 153 देशांतील 94 प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रे आहेत. शशांक यांचे नाव लिम्कामध्ये 3 वेळा, इंडिया बुकमध्ये एक वेळा, क्रेडेन्स बुकमध्ये एकदा तसेच ओएमजी रेकॉर्ड बुकमध्ये एक वेळा समाविष्ट झाले आहे. शशांक सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध देशांतील लोकांकडून वर्तमानपत्र गोळा करत आहे."साशा यांनी सांगितले की, पत्रकार म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी मला काही वृत्तपत्र गोळा करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत, मी 10 हजाराहून अधिक वृत्तमानपत्र गोळा केली आहेत. मला राज्यपालांकडून पुरस्कार मिळाला असून, जाजपूर गावात एक संग्रहालय देखील उभारले आहे."

हेही वाचा-MH Legislative Council elections : राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details