नवी दिल्ली Guidelines for Coaching Classes :केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं कोचिंग क्लाससाठी नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार 16 वर्षाखाली विद्यार्थ्यांची कोचिंग क्लासमध्ये नोंदणी करू नये, दिशाभूल करणारी आश्वासनं देऊ नये, चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही. अशी नियमावली जाहीर केली आहे. कोचिंग क्लासेसच्या संस्थांचे नियमन करण्यासाठी कायदेशीर चौकट गरजेचं असल्याचंही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोचिंग क्लासमध्ये 16 वर्षापेक्षा कमी विद्यार्थ्यांची नोंदणी करू नये :खासगी कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश देण्यात येतो. मात्र अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, कोचिंग क्लासमध्ये घडलेल्या आगीच्या घटना, सुविधांचा अभाव आणि खासगी कोचिंग क्लासनं अवलंबलेली शिकवण्याची पद्धत याला आळा घालण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडं आलेल्या तक्रारीवरुन ही नियमावली तयार केली आहे.
काय आहे खासगी कोचिंग क्लाससाठी नवीन नियमावली :केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं खासगी कोचिंग क्लाससाठी नवीन नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार 16 वयाच्या आतील विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग क्लासला प्रवेश देऊ शकत नाही. कोणतंही खासगी कोचिंग क्लास पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही. खासगी कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था, पालकांना दिशाभूल करणारी आश्वासनं देऊ शकत नाही. कोणतंही खासगी कोचिंग क्लास चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही. खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी असणं बंधनकारक आहे. अशी नियमावली खासगी कोचिंग क्लासेससाठी आखून देण्यात आली आहे.
खासगी कोचिंग क्लासची वेबसाईट असावी :खासगी कोचिंग क्लासकडं आपली वेबसाईट असावी. या वेबसाईटवर शिकवणाऱ्या शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम, आकारलं जाणारं शुल्क, याचा तपशील नमूद करावा. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक दबाव असू नये, त्यासाठी खासगी कोचिंग क्लासनं पावलं उचलावी, असंही या नवीन नियमावलीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नमूद केलं आहे.
हेही वाचा :
- कोचिंग क्लासचालकांनी ठोठावला राज ठाकरेंचा दरवाजा
- खासगी कोचिंग क्लास संघटनेचे शासकीय शिक्षकांविरुद्ध आंदोलन
- खासगी कोचिंग क्लासची उलाढाल कोटींवर; विद्यार्थ्यांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर