असा साजरा करतात गुढी पाडवा...... - मराठी नववर्ष
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या गुढीपाडवा आज साजरा केला जात आहे. मराठी नववर्षाचा पहिला दिवस असणारा यंदाचा गुढीपाढवा घरातच राहून साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गुढीपाडवा शांततेत साजरा केला जात असला तरीही, त्याचा उत्सव काही कमी झाला नाही. चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याचे महत्व.......
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या गुढीपाडवा आज साजरा केला जात आहे. मराठी नववर्षाचा पहिला दिवस असणारा यंदाचा गुढीपाढवा घरातच राहून साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गुढीपाडवा शांततेत साजरा केला जात असला तरीही, त्याचा उत्सव काही कमी झाला नाही. या दिवसाला मराठी माणसाच्या लेखी तेवढेच महत्व आहे. या दिवशी शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला होता. उद्या माणसाला उत्तम जीवन आणि सौख्य मिळावे यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभी केली जाते. मराठी वर्षात असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त समजला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन कामाचा शुभारंभ केला जातो, तसेच नवीन वस्तू तसेच सोने खरेदी केले जातात. चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याचे महत्व.......