महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

GST Notice Of Crores : महिन्याला कमाई 4 हजार अन् जीएसटी चक्क 1 कोटींचा! - कोटींचा कर थकित

जैसलमेरच्या गरीब नरपतरामला अचानक कळले की तो करोडोंचा मालक आहे. या तरुणाला जीएसटी विभागाच्या नोटीसद्वारे सांगण्यात आले की त्याच्याकडे कोटींचा कर थकित आहे. (gst notice of crores to poor man). त्याने त्याच्या स्तरावर तपास केला असता, तो ऑनलाइन फसवणुकीचा बळी पडला असे आढळून आले आहे. (gst fraud in jaisalmer)

GST Notice Of Crores
GST Notice Of Crores

By

Published : Jan 5, 2023, 8:18 PM IST

पाहा व्हिडिओ

जैसलमेर (राजस्थान) : राजस्थानच्या जैसलमेर येथून एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे जीएसटी विभागाच्या कृपेमुळे एका गरीब व्यक्तीला कोट्यावधींचा कर जमा करण्याची नोटीस मिळाली आहे! (gst notice of crores to poor man). जीएसटी विभागाने रिडवा गावातील नरपतराम याला चक्क 1 कोटी 39 लाख 79 हजार 407 रुपये जीएसटी कर थकीत असल्याची नोटीस पाठवली आहे. हा कर लवकरात लवकर न भरल्यास कारवाई केली जाईल असे देखील नोटीसीत लिहिले आहे. (gst fraud in jaisalmer)

जीएसटी नोटीस

कमाई 4000 आणि जीएसटी 1 कोटींचा! : झालेल्या प्रकरणावर नरपतराम म्हणाला, "मी महिन्याला फक्त 4000 रुपये कमवतो. माझे वडील शेती करून घरखर्च चालवतात. अशा स्थितीत मला ही नोटीस मिळताच धक्काच बसला. माझ्या नावावर कोणतेही फर्म नाही, मग आयकर विभागाने नोटीस का पाठवली? मला काही महिन्यांपूर्वी कोणीतरी मोबाईलवर कॉल करून आधार कार्ड, पॅन क्रमांक आणि इतर कागदपत्रांची माहिती मागितली होती. ओटीपीही विचारला होता. मी अजातपणाने त्यांना तो दिला. हा त्याचाच परिणाम असू शकतो."

नरपतच्या नावावर दिल्लीत फर्म! :जीएसटी नोटीसीतील नरपतच्या कागदपत्रांच्या आधारे दिल्लीत एका व्यक्तीने फर्म स्थापन केल्याचे समोर आले आहे. ती व्यक्तीही दिल्लीची आहे. याच कंपनीच्या जोरावर बनावटगिरीचा खेळ रचला गेला. याचे परिणाम आता नरपत याला भोगावे लागत आहेत. 29 डिसेंबर 2022 रोजी त्याला जीएसटी भरण्याच्या सूचनांसह नोटीस मिळाली. नरपतराम याने सांगितले की, त्याला केंद्रीय आयुक्तालय दिल्ली उत्तरकडून जीएसटी विभागाची नोटीस मिळाली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की या पॅनकार्ड आणि आधार कार्डवर एका कंपनीचे रजिस्ट्रेशन ऑपरेशन केले जात आहे, ज्याचा जीएसटी थकित आहे.

कुटुंब चिंतेत, विभागाची धावपळ : नोटीस मिळाल्यानंतर तो आणि त्याचे कुटुंब तणावात आहे. पीडित नरपतराम सांगतो की तो महिन्याला चार ते पाच हजार रुपये कमावतो. त्याच्याकडे तज्ज्ञ किंवा सरकारी वकिलाचा सल्ला घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्याला जे जमतं ते तो करत आहे. तो सतत प्रशासकीय विभाग आणि पोलिस ठाण्यांच्या फेऱ्या मारतो आहे, परंतु हाती काहीच लागत नाही आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details