नवी दिल्ली : सरकारने जुनी कर पद्धत मोडून नवीन जीएसटी कर पद्धत लागू केल्याने सरकारच्या तिजोरीत या पद्धतीने चांगलीच भर पडत आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या विक्रमी जीएसटीने एक रेकॉर्ड सेट केला आहे. एप्रिल महिन्यात एकूण GST महसूल 1 लाख 87 हजार 035 कोटी रुपये होता. तो मार्च 2023 च्या 1 लाख 60 हजार 122 कोटी रुपयांच्या सकल GST महसूल संकलनापेक्षा 16.8 टक्के अधिक आहे. एप्रिल 2023 मध्ये एकूण GST संकलन देखील आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे. 1 लाख 67 हजार 540 लाख कोटी रुपयांचे हे आधीचे रेकॉर्ड एप्रिल महिन्यात मोडून 19 हजार 495 कोटी अधिक आहे.
पहिल्यांदाच ओलांडला 1.75 लाख कोटीचा टप्पा :आतापर्यंतच्या एकून आकडेवारीत पहिल्यांदाच GST संकलनाने 1.75 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 1 लाख 87 हजार 035 कोटी रुपयांच्या एकूण GST संकलनामध्ये CGST 38 हजार 440 कोटी रुपये, SGST 47 हजार 412 कोटी रुपये, IGST रुपये 89 हजार 158 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 34,972 कोटी रुपयांसह) आणि सेस 12 हजार 025 कोटी रुपयांचा समावेश असल्याचे वित्त मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत 12 टक्के जास्त महसूल :सरकारने IGST मधून CGST मध्ये 45 हजार 864 कोटी रुपये आणि SGST मध्ये 37 हजार 959 कोटी रुपये सेटल केले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार नियमित सेटलमेंटनंतर एप्रिल 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 84 हजार 304 कोटी रुपये आणि SGST साठी 85 हजार 371 कोटी रुपये आहे. एप्रिल 2023 चा महसूल मागील वर्षी याच महिन्यात नोंदवलेल्या GST महसुलापेक्षा 12 टक्के अधिक आहे. एप्रिल 2023 मध्ये देशांतर्गत व्यवहारांमधून मिळालेला महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 16 टक्के जास्त होता.
20 एप्रिलला सर्वाधिक कलेक्शन :मार्च 2023 मध्ये उत्पन्न झालेल्या ई वे बिलांची एकूण संख्या 9 कोटी होती. ती फेब्रुवारी 2023 मध्ये उत्पन्न झालेल्या 8.1 कोटी ई वे बिलांपेक्षा 11 टक्के जास्त आहे. एप्रिल 2023 मध्ये एकाच दिवशी म्हणजे 20 एप्रिलला आतापर्यंतचे सर्वाधिक कर संकलन झाले. तेव्हा 9.8 लाख व्यवहारांद्वारे 68 हजार 228 कोटी रुपये भरले गेले. गेल्या वर्षी 20 एप्रिलला 9.6 लाख व्यवहारांद्वारे सर्वाधिक एक दिवसाचे कलेक्शन 57 हजार 846 कोटी रुपये होते.
हेही वाचा - Reactions On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावर राजकीय प्रतिक्रिया