भोपाळ (मध्य प्रदेश)- येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर ( CGST ) विभागाने 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या बनावट पावत्या तयार आणि पास करण्यामध्ये गुंतलेल्या बनावट जीएसटी क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी (दि. 28 मे) ही माहिती दिली. माहितीच्या आधारे, सीजीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसह गुजरातमधील सुरत येथून दोघांना अटक केल्याचा दावा केला.
500 हून अधिक बनावट कंपन्यांचे दस्तऐवज सापडले -या बनावट रॅकेटचा मुख्य आणि त्याच्या एका जवळच्या सहकाऱ्याला 25 मे रोजी एका छाप्या दरम्यान अटक करुन आणि इंदूरला नेण्यात आले, असे या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. त्यांच्या ताब्यातून 500 हून अधिक बनावट कंपन्या तसेच बनावट कागदपत्रे, साहित्य, डेटा आणि अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, शोध मोहिमेदरम्यान सुमारे 300 बनावट कंपन्या आणि लेटर पॅडही जप्त करण्यात आले आहेत.