नवी दिल्ली -देशात कोरोनाची वाढणारी नवीन रुग्णांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाताली कोरोना परिस्थितीची माहिती दिली. देशातील 89.51 टक्के लोक कोरोनामुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. देशात कोरोनामुळे 1.25 टक्के मृत्यू झाले आहेत. तर 9.24 रुग्ण सक्रिय आहेत. कोरोना झपाट्याने वाढत असल्याचे मंत्रालयाचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यूची संख्या पाहता, लक्षात येईल की कोरोना रुग्णांचा मृत्यू वेगाने होत आहे. 879 लोकांचा मृत्यू झाला आहे.
राजेश भूषण यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीबद्दल भाष्य केले. महाराष्ट्रातील सरासरी दैनंदिन रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. तर पंजाबमध्ये फेब्रुवारी महिन्यात दररोज 300 रुग्णांची नोंद होत होती. आता ही वाढून 3 हजारवर गेली. तर कर्नाटकात दररोज सरासरी 404 प्रकरणे नोंदवली गेली होती. तर ती आता वाढून 7 हजार 700 झाली आहे. हे चिंतेचे मुख्य कारण आहे.
रुग्णांचा वाढता आलेख -
दिल्लीमध्ये दररोज 134 रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्ण संख्या 8 हजार 104 वर गेली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये फेब्रवारी महिन्यात 267 रुग्णांची नोंद होती. आता ही संख्या वाढून 4 हजार 900 वर गेली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये 450 रुग्णांची नोंद होत होती. तर आता ही संख्या 5 हजार 200 झाली आहे. याचबरोबर दिल्लीमध्ये 134 रुग्ण आढळत होते. आता ही संख्या वाढून 8 हजार 104 वर गेली आहे.
लसीकरण वेगाने सुरू -
आज सकाळी 8 वाजेपर्यंत देशात 10.85 कोटीहून अधिक कोरोना लस डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 40 लाखाहून अधिक डोस देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. देशात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्पुटनिक-व्ही या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सहा ते सात महिन्यांमध्ये स्पुटनिक-५चे सुमारे दहा कोटी डोस आयात करण्यात येणार आहेत.
हेही वाचा -सुशील चंद्रा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली