बंगळुरू -तमिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतून ( CDS Bipin Rawat Chopper Crash ) बचावलेले एकमेव वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह ( Indian Air Force’s Group Captain Varun Singh ) यांचे आज निधन झाले. हेलिकॉप्टर दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. देशभरातून त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
वरूण सिंह यांनी अभिमानाने, शौर्याने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झालं आहे. त्यांनी देशासाठी केलेली भरीव सेवा कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. ओम शांती, असे टि्वट मोदींनी केले आहे.
लष्कराच्या हेलिकॉप्टरचा तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं होतं. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झालं होतं. या अपघातामधून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले होते. मात्र, आज रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शौर्य चक्राने सन्मानित -