महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Groom Kissed Bride On Stage : वराने स्टेजवरंच घेतले वधूचे चुंबन!, वाचा पुढे काय झाले.. - स्टेजवरंच घेतले वधुचे चुंबन

लग्नाचे सर्व विधी पार पडले होते. मात्र जयमाला दरम्यान वधूचे चुंबन घेताना वराने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. यावरून हा सर्व वाद झाला. (bride refused to marry in sambhal) (sambhal bride wedding case).

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 30, 2022, 9:59 PM IST

संभल (उत्तर प्रदेश) : यूपीच्या संभल जिल्ह्यातून एक मजेदार घटना समोर आली आहे. वराने स्टेजवर चुंबन घेतल्याने वधूला राग आला. नवरीचा पारा इतका चढला की तिने सरळ लग्नालाच नकार दिला! (Groom Kissed Bride On Stage). त्यानंतर घरातील सदस्य आणि वऱ्हाडींमध्ये तू-तू-मैं-मी सुरू झाले. यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. वधूने दोन्ही पक्षांमधील विवाहबंधन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आणि वराला वधूशिवायच परतावे लागले. हे प्रकरण संभलमधील बहजोई पोलीस स्टेशन हद्दीतील गावाशी संबंधित आहे. (bride refused to marry in sambhal) (sambhal bride wedding case).

जयमाला दरम्यान वधूचे चुंबन :26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेंतर्गत बदाऊनच्या बिलसी येथील तरुणाचा बहजोई पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील तरुणीशी विवाह झाला. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनंतर मंगळवारी वर आणि त्याचे कुटुंबीय मिरवणुक घेऊन वधूच्या गावी पोहोचले. येथे लग्नाचे विधी पार पडले. मात्र जयमाला दरम्यान वधूचे चुंबन घेताना वराने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. यावरून हा सर्व वाद झाला.

प्रकरण पोहचले पोलिस ठाण्यात! : गावातील उच्चभ्रू लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, वराच्या वारंवार होणाऱ्या अश्‍लील कृत्याला कंटाळून वधूने लग्नाचे इतर विधी थांबवून गोंधळ घातला. वराच्या बाजूने वधूची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र, यापुढे हे लग्न करणार नाही यावर वधू ठाम होती. यानंतर गावात पंचायत आयोजित करण्यात आली. पंचायतीमध्ये वधूने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण बहजोई पोलीस ठाण्यात पोहोचले. येथे पंचायतीच्या संमतीच्या आधारे लग्नाचे सर्व विधी रद्द करून वराला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. त्याचवेळी स्टेशन प्रभारी पंकज लावनिया यांनी सांगितले की, त्यांच्याकडे कारवाईसाठी कोणतीही तक्रार आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details