नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाच्या संकटात ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ब्लॅक आणि व्हाईट फंगसची लागण झाल्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना आपले डोळे गमावावे लागले आहेत. यातच फक्त ब्लॅक, व्हाईट फंगस नाही. तर तब्बल लाखो प्रकारच्या फंगसची लागण मानवी शरीराला होऊ शकते.
कोट्यावधी प्रकारचे फंगस निसर्गात आढळतात. यापैकी सुमारे 14 हजार फंगससंदर्भातील माहिती लोकांना आहे. यातील वेगवेगळ्या प्रकारच्या 300 फंगसमुळे मानवी शरीरात आजार उद्भवू शकतात, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. पांढरा, काळा, हिरवा, लाल, गुलाबी आणि निळा या प्रकारचे फंगस असतात. तर काही फंगस पूर्णपणे अज्ञात आहेत, असे फंगसचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी सांगितले.
कोरोना रुग्णांवर होत असलेली उपचार पद्धती हे मानवी शरिरात होत असलेल्या फंगसचे मुख्य कारण आहे. कोरोनामुळे रूग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. फंगस बाहेरून येत नाही. तो आपल्या सभोवतालच्या वातावरणात आढळतो. सामान्यत:फ्रीजमध्ये आणि ओलसर ठिकाणी आढळतो. यापैकी कोणत्याही माध्यमातून तो शरीरात पोहोचतो. फंगस शरीरात पसरण्यापासून रोखण्यासाठी काही अत्यल्प स्वस्त औषधे देखील उपचारादरम्यान दिली जातात. स्वच्छता राखल्यास फंगसचा संसर्ग होत नाही. तसेच उपचारादरम्यान काही निष्काळजीपणा केल्यास फंगसचा संसर्ग वाढत आहे. व्हाईट आणि ब्लॅक फंगसचे रुग्ण अनेक ठिकाणी आढळले आहेत.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?