नवी दिल्ली :नवी दिल्ली इथं 9 तसंच 10 सप्टेंबर रोजी होणारी G20 शिखर बैठक प्रगती मैदानावर होणार आहे. G20 च्या पार्श्वभूमीवर दिल्ली सजली आहे. या संदर्भात जगातील सर्वात मोठी नटराजाची मूर्ती भारत मंडपासमोर बसवण्यात आली आहे. ही मूर्ती 28 फूट उंच तसंच 18 टन वजनाची आहे. नटराजाची ही मूर्ती तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणमजवळील स्वामीमलाई येथील देव सेनाधिपती शिल्प गॅलरीत तयार करण्यात आली आहे. नटराजाची ही विशाल मूर्ती इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सनं भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली दिल्लीत आणत, प्रगती मैदानासमोर स्थापित केली आहे. इथंच G20 शिखर परिषद होणार आहे.
नटराजाची मूर्ती बसवली : या मूर्तीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक स्वामीमलाई श्रीकांदा स्थपती यांनी सांगितलं की, ही तमिळनाडू कलेची शान आहे. येणार्या पिढ्यांना याची माहिती व्हावी, यासाठी ही मूर्ती बनवण्यात आली आहे. हा आपल्या कलेचा गौरव असल्याचं देखील ते म्हणाले.
5 वेगवेगळ्या धातूंपासून बनवली मूर्ती :ते असेही म्हणाले की ते पारंपारिक IMPON धातूपासून बनवण्याऐवजी ही मूर्ती सोनं, चांदी, शिसं, तांबं तसंच लोह अशा 5 वेगवेगळ्या धातूंपासून बनवली आहे. एकाच साच्यातील नटराज मूर्ती जगातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक देव बंधूंसह 30 शिल्पकारांच्या टीमनं तयार केली आहे. यात राधाकृष्णन, देवा यांचा समावेश आहे. कुंभकोणमजवळील स्वामीमलाई येथील देवसेनापती स्कल्पचर गॅलरीत जवळपास सहा महिन्यांच्या अविरत प्रयत्नानंतर नटराजमूर्ती तयार करण्यात आलीय.
मूर्तीचा फोटो मोदींनी केला ट्वीट : नटराज मूर्तीचे 75 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स तसंच प्राध्यापक अचल पांड्या यांच्या नेतृत्वाखालील टीमनं गेल्या महिन्याच्या 25 तारखेला स्वामीमलाई येथून कडक सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला आणण्यात आली. यानंतर 30 जणांच्या टीमनं दिल्लीत उर्वरित काम पूर्ण करून मूर्तीची संपूर्ण रचना केली. यानंतर नटराजाची विशाल मूर्ती जी-20 शिखर परिषदेच्या स्थळासमोर बसवण्यात आली. यासोबतच प्रगती मैदानात स्थापन करण्यात आलेल्या या 28 फूट उंच, 21 फूट रुंद, सुमारे 18 टन वजनाच्या नटराजाच्या विशाल मूर्तीचा फोटो पंतप्रधान मोदींसह अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट केला आहे.
हेही वाचा -
- Human Centric Globalization : जी २० च्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम् चा मोदींचा संकल्प, सर्वांना सोबत घेण्याचा व्यक्त केला इरादा
- Udhayanidhi Stalin News: मोदी आणि कंपनीकडून लक्ष विचलित करण्याकरता 'सनातन'चा वापर - उदयनिधी
- Parliament Special Session : संसदेचं विशेष अधिवेशन होणार नवीन संसद भवनात